1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (09:05 IST)

एसटी कामगार आज कामावर रुजू न झाल्यास बडतर्फ : अनिल परब

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी राज्यातील 250 पैकी 39 आगारांमध्ये संप सुरूच आहे.
 
त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून, सोमवारपासून कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी जाहीर केलं आहे. 
एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यातील लातूर विभागातील 5, नांदेड विभागातील 9 , भंडारा विभागातील सहापैकी 3 , गडचिरोली विभागातील सर्व 3, चंद्रपूर विभागातील 4 , यासह कोल्हापूर, वर्धा, सांगली, सोलापूर, नाशिक, यवतमाळ, अमरावती विभागातील एकूण 39 आगारं सायंकाळी पाचपर्यंत बंद होती.