शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :श्रीगोंदा , गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (17:11 IST)

सुभेदार मोरे यांना वीरमरण

subhedar
श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावचे सुपुत्र शहीद सुभेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे (वर्षे 44) यांचे 23 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये देश सेवेत कार्यरत असता 27 फेबु्रवारीला वीरमरण आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी एरंडोली याठिकाणी येणार असून त्यांच्यावर आज (मंगळवारी) शासकीय इतमामात एरंडोलीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
शहीद सुभेदार मोरे यांनी 23 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 18 वर्षे सेवा पूर्ण करून दोन वर्षे जादा सेवा केल्यानंतर पुन्हा सहा महिने सेवा करत होते. यादरम्यान हेलिकॉप्टर अपघातामध्ये ते जखमी होऊन त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात वयोवृध्द वडील सखाराम गोविंद मोरे,आई सुलाबाई सखाराम मोरे, पत्नी सुरेखा ज्ञानेश्वर मोरे, मुलगा महेश ज्ञानेश्वर मोरे (20 वर्षे) मुलगी अर्पिता मोरे (15 वर्षे ) तसेच भाऊ तुकाराम सखाराम मोरे व इत्यादी त्यांच्या पश्चात परिवार आहे.