मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:49 IST)

विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविणार

राज्यातील अनेक महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहे. अशावेळी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे हे महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ‘मी काल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी महाविद्यालये सुरु करण्याबाबत बोललो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागतच आहे. मात्र, आता यापुढे 18 वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांचं लसीकरण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. तसंच पोस्ट व्हॅक्सिनेशन बाबतही काळजी घ्यायची आहे. या दृष्टीकोनातून जे किट आहेत ते आपल्याला उपलब्ध करुन द्यावे लागणार असल्याचं टोपे म्हणाले. 
 
हॉटेल आणि रेस्टॉरंट्सची वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमच्या विभागाची बैठक झाली. त्यातील जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार रात्री 12 वाजेपर्यंत रेस्टॉरंट्स आणि हॉटेलची वेळ वाढवण्यात आली आहे. तर सर्व दुकानांनी रात्री 11 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. हा निर्णय मुंबईबाबतचा असला तरी इतर ठिकाणी जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात वेळेबाबतचा निर्णय घेतील, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.