बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2024 (09:26 IST)

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

death
वडिलांनी कामावर जाण्यास सांगितल्यावर एका 19 वर्षीय तरुणाला राग आला आणि त्याने रागाच्या भरात येऊन 22 मजल्या इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
 
कांदिवली परिसरात मुलाला कामावर का जात नाही म्हणत वडिलांनी रागावले. या गोष्टीवरून मुलाला राग आला आणि त्याने 22 मजल्या इमारतीच्या छतावरून उडी घेत आत्महत्या केली.प्रथम कृष्णा नाईक असे या मयत तरुणाचे नाव आहे. तो एका मॉल मध्ये पिझ्झा शॉपवर काम करायचा.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम सोमवारी कामावर गेला नाही.म्हणून दुकानावरून त्याच्या वडिलांना फोन आला. त्याला वडिलांनी शोधले असता तो त्यांना रात्री डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकावर बसलेला दिसला. त्यांनी त्याला कामाला का गेला नाही म्हणून विचारले. आणि कामाला जायला सांगितले. 

त्याला या गोष्टीचा राग आला आणि त्याने रागाच्या भरात येऊन 22 मजल्याच्या इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. स्थानिकांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पहिले आणि त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. पोलिसांनी या अपघाती मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit