गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (10:08 IST)

पॉस्को केस मधील आरोपीला मुंबई हाय कोर्टाने दिला जामीन

पॉस्को केस मधील आरोपीला मुंबई हाय कोर्टाने जामीन दिला आहे. कोर्ट म्हणाले की, त्याचा हेतू लैंगिकदृष्ट्या नव्हता. आरोपी कपिल टाक विरोधात पुण्यामध्ये 377 म्हणजे अनैसर्गिक अपराध सॊबत अनेक कलाम अंतर्गत केस दाखल झाली होती. अल्पवयीन पीडितांमधील एकाच्या आईने  एप्रिल 2021 मध्ये केस नोंदवली होती. 
 
मुंबई हाय कोर्टाने पुण्याच्या 33 वर्षीय व्यक्तीला जामीन मंजूर केला आहे. ज्यावर त्याच्या साथीदारांसोबत मिळून तीन अल्पवयीन मुलांचा लैंगिकछळ करून व्हिडीओ बनवल्याचा आरोप होता. तसेच हाय कोर्ट म्हणाले की, कोणताही लैंगिक हेतू न्हवता, केवळ पीडितांना शारीरिक आणि मानसिक यातना देण्यात आहेआली होती. कारण आरोपींना वाटलं की ते मुले चोर आहे. आरोपींविरोधात 377 म्हणजे अनैसर्गिक अपराध सोबत अनेक कलाम अंतर्गत केस नोंदवण्यात आली होती. 
 
अल्पवयीन पीडितांमधील एकाच्या आईने एप्रिल 2021 मध्ये केस नोंदवली होती. पीडितांच्या आई ने काही लोकांना व्हिडीओ पाहतांना पहिले होते. जिथे काही अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात येत होती. व त्यांच्या  प्रायव्हेट पार्टसोबत दुर्व्यवहार केला जात होता. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी या घटनेचा सीसीटीव्ही मिळवला. त्यानंतर आरोपींना पॉस्को कायदा नुसार अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आले होते.