आदित्य ठाकरेंची ड्रग टेस्ट करा : नीलेश राणे

aditya thackare
Last Modified गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (13:23 IST)
हिंदी चित्रपटसृष्टीत सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh rajput) प्रकरणाच्या निमित्तानं वादही उफाळून आले आहेत. या प्रकरणात ड्रग रॅकेटचीही चर्चा असल्यानं त्यावरूनही टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. सुशांत प्रकरणात बॉलिवूडमधील काही मंडळींना व मुंबई पोलिसांना लक्ष्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिनं काही अभिनेत्यांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तोच मुद्दा उचलून धरत माजी खासदार नीलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांना लक्ष्य केलं आहे.
सुशांत प्रकरणात (Sushant Singh rajput) कंगना राणावत हिनं सुरुवातीला बॉलिवूडमधील घराणेशाही व कंपूशाहीवर हल्लाबोल केला होता. मात्र, या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानंतर तिनं मुंबई पोलीस व राज्य सरकारवर टीका सुरू केली होती. आता या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर तिनं बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांना लक्ष्य केलं होतं.

रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी ड्रग टेस्ट करून घ्यावी, अशी मागणी तिनं केली होती. हे चौघे कोकेनच्या आहारी गेल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी टेस्ट करून ह्या अफवांना उत्तर द्यावं. असं करून ते लाखो तरुणांसमोर एक उदाहरण ठेवू शकतात, असं ट्वीट तिनं केलं होतं. कोणत्याही कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची ब्लड टेस्ट करावी, असंही ती एका मुलाखतीत म्हणाली होती.
कंगनाच्या ह्याच मागणीच्या अनुषंगानं नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'केवळ रणवीर आणि रणबीरच कशाला? आदित्य ठाकरे यांनीही ड्रग टेस्ट करावी. शेवटी बॉलिवूडमधील अंतर्गत वर्तुळात त्यांचाही वावर असतो,' असं नीलेश राणेंनी म्हटलं आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

IPL 2021, DC vs MI: दिल्लीकडून झालेल्या पराभवानंतर रोहित ...

IPL 2021, DC vs MI: दिल्लीकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माला आणखी एक धक्का बसला, यामुळे त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला
आयपीएल 2021 मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून ...

औषधांच्या काळ्या बाजारप्रकरणी कारवाई करत २ हजार २०० ...

औषधांच्या काळ्या बाजारप्रकरणी कारवाई करत २ हजार २०० रेमडेसिवीरचा इंजेक्शन जप्त
मुंबई पोलिसांनी कोरोनाशी संबंधीत औषधांच्या काळ्या बाजारप्रकरणी कारवाई करत २ हजार २०० ...

राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह ...

राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान जाहीर – अनिल परब
राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्या ...

राज्यात 62,097 नवे रुग्ण; 54,224 जणांना डिस्चार्ज

राज्यात 62,097 नवे रुग्ण; 54,224 जणांना डिस्चार्ज
राज्यात मंगळवारी तब्बल 62 हजार 097 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 54 हजार ...

कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची पोलिसांत ...

कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार
एका विशिष्ट कंपनीचे खाद्य खाल्ल्याने पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यानी अंडे देण्याचे बंद ...