गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:12 IST)

सांगली : अपघातामध्ये ६ पैलवानांचा मृत्यू

सांगली-कडेगाव येथील वांगी येथे ट्रॅक्टर आणि क्रुझर जीप या वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून त्यात ६ पैलवानांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिरगांव फाटा येथे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. साताऱ्यातील औंध येथे कुस्ती स्पर्धेत खेळून परतताना हा अपघात घडला. आकाश देसाई, विजय पाटील, सौरभ माने आणि शुभम घारगे अशी मृत पैलवानांची नावे आहेत.

एका ट्रॅक्टरला पैलवानांना घेऊन जाणाऱ्या क्रुझर जीपने समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात ५ पैलवानांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर ५ जणही गंभीर जखमी झाले आहेत. जीपमधून एकूण अकरा जण प्रवास करीत होते. या भीषण अपघातात क्रुझर जीपचा चक्काचूर झाला असून ट्रॅक्टरचा मागचा टायरही फुटला.