सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (09:48 IST)

RIP सीआरपीएफचे कमांडो रवींद्र सहारे यांचे अपघाती निधन

केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान कमांडो हवालदार रवींद्र राजाराम सहारे ( वय 42) यांचे मंगळवारी नाशिकात अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ते सुट्टीत आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गावी आले होते. त्यांचे अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी ते संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हरसूल गावातून दोन लोकांसोबत दुचाकीने कुळवंडी गावाकडे जात होते. यावेळी मुख्य रस्त्यावरील पालीफाटा याठिकाणी एका भरधाव जाणाऱ्या टाटा सुमोने धडक दिल्याने  ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
 
शेतकरी राजाराम सहारे यांचे पुत्र सीआरपीएफचे जवान रवींद्र सहारे हे नाशिकच्या हरसूलजवळ पेठ तालुक्यात येणाऱ्या मुळ कुळवंडी गावचे भुमीपुत्र होते. ते मागील अनेक वर्षांपासून सीआरपीएफमध्ये कर्तव्यावर राहून देशसेवा बजावत होते. ते सुट्टीत जम्मू-काश्मिर येथून राहत्या घरी कुटुंबीयांच्या भेटीसाठी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन शाळकरी मुले असा परिवार आहे. वर्षभरानंतर ते सीआरपीएफच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.