सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (15:38 IST)

वाहतूक हवालदारावर डोक्यात वीट मारून हल्ला , आरोपी ताब्यात

ठाणे जिल्ह्यात दारून पिऊन  तरर्र असलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली. यात ठाणे शहर वाहतूक विभागातील कापूरबावडी उपशाखेचे हवालदार नवनाथ कांदे यांच्या डोक्यात वीट मारून हल्ला केल्याची घटना  समोर आली. याप्रकरणी त्या दुचाकीस्वारांना राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतले. तर कांदे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
धुळवडीच्या निमित्ताने शुक्रवारी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विशेष मोहीम हाती घेतली होती. याकरिता विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. यात मद्यपी वाहनचालकांची तपासणी सुरू असताना माजीवडा नाका येथे कापूरबावडी वाहतूक पोलिसांकडून तपासणी सुरू होती. यावेळी हवालदार नवनाथ कांदे यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या भागीरथ चव्हाण आणि अनिल गुप्ता यांना थांबवले. याचदरम्यान त्या दोघांनी कांदे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
 
मात्र कांदे हे तपासणीवर ठाम राहिले आणि त्यांनी तपासणी केली. यात या दोघांनीही मदयप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.  याचा राग मनात धरून मागील सीटवर बसलेल्या अनिल गुप्ता याने तिथे पडलेला वीट उचलून हवालदार कांदे यांच्या डोक्यावर हल्ला केला. यात कांदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.