सोमवार, 29 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (15:35 IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसह बाचाबाची

Swabhimani Shetkari Sanghatana activists clash with police स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसह बाचाबाची Marathi Regional News  In Webdunia Marathi
सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पोलिसांच्यामध्ये बाचाबाची झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली बँकेच्या मुख्यालयासमोर राडा केला. राजकीय नेत्यांच्या संस्थांना 100कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याच्या बँकेच्या प्रस्तावाच्या विरोधात संघटना आक्रमक झाली आणि कार्यकर्त्यांनी बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने बड्या थकबाकीदारांची कर्ज माफ करण्याच्या निर्णयाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला होता. आणि कार्यकर्त्यांनी बँकेत घुसण्याचा प्रयत्न करत असता. पोलिसांनी त्यांना अडविले आणि दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या वेळी परिसराचे वातावरण तणावपूर्ण झाले.5कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या पायर्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी  केली.