सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (11:39 IST)

प्रेम भंग प्रकरणातून नकार दिल्याने प्रियकराने तरुणीचा गळा चिरून खून केला, आरोपी ताब्यात

नांदेड शहरात प्रेमप्रकरणातून नकार दिल्यामुळे एका तरुणीचा भरदिवसा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी गौर (22) असे या मयत तरुणीचे नाव आहे. आणि सुरेश शेंडगे (26) असे आरोपीचे नाव आहे. या दोघांचे पाच सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. ब्रेकअप झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.या घटनेमुळे नांदेड परिसरात खळबळ उडाली आहे. मयत तरुणी आपल्या आई वडिलांसह शारदा नगर येथील झेंडा चौक परिसरात राहत होती. तरुणीचे आरोपीसह प्रेम संबंध होते. मात्र काही दिवसापासून त्यांच्यात दुरावा आला होता. आणि तिने पुढे नातं वाढविण्यास नकार दिला. प्रेम भंग झाल्यामुळे आरोपी सुरेश चिडला. त्याला वैष्णवीचा राग आला आणि प्रेमाला नकार दिल्यामुळे त्याने वैष्णवीच्या घरी जाऊन भरदिवसा गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.