रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (08:38 IST)

मुंबई,नवी मुंबई नंतर सिडको तिसरी मुंबई वसवणार.पनवेल,उरण तालुक्यातील 23 गावांचा समावेश

cidco
मुंबई,नवी मुंबईनंतर आता... सिडको तिसरी मुंबई वसवणार.पनवेल,उरण तालुक्यातील 23 गावांचा समावेश.पायाभुत सुविधांसाठी 12 हजार कोटी रुपये करणार खर्च .
 मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई म्हणून उदयास येणार्‍या पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12 हजार कोटी रूपये खर्च करून रस्ते उभारणार आहे. नैना क्षेत्र असलेल्या या 23 गावांचा झपाटयाने विकास व्हावा यासाठी सिडकोने हा धोरणात्मक निर्णय घेतला असून येत्या महिनाभरात या कामांचे टेंडर काढले जाणार आहेत. सिडको रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर करणार असल्याचे सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. विमानतळाच्या पुर्वेला असलेल्या पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांचा विकास सिडको नैना योजनेअंतर्गत करणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, खालापूर, कर्जत परिसरात सिडको नैना योजनेतून भविष्यात विकास करणार असली तरी सद्या पहिल्या टप्यात फक्त पनवेल आणि उरण तालुक्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
 
12 नोडची विकासकामे एकाच टप्प्यात होणार
सिडकोकडून नविन क्षेत्राचा विकास होताना एकसंघ न होता तुकड्या तुकड्यात केला जातो. यामुळे प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या भुखंडांना योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे यावर विशेष लक्ष देत सिडको आता नैना भागातील 12 नोडची विकासकामे टप्याटप्यात न करता एकाच टप्प्यात हातात घेणार आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने खाजगी कंपनीला काम दिले आहे. एकदा आराखडा तयार झाली की पुढील महिनाभरात सिडको टेंडर काढून कामे हाती घेणार आहे . या संपूर्ण कामासाठी सिडकोला साधारण 12 करोड रूपये खर्च अपेक्षित आहे.मेगा प्लान तयार, ना सिग्नल, ना चौक, रस्त्यांचे आराखडे तयार.






 


Edited By - Ratnadeep ranshoor