मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (21:30 IST)

बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात आक्रमक भूमिका

murlidhar jadhav
कोल्हापुरात देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
 
येत्या 25 तारखेला आपण हजारो शिवसैनिकांना घेऊन धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे. तसेच गद्दारी का केली याचा जाबही विचारणार आहोत, अशी भूमिका मुरलीधर जाधव यांनी घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
 
यावेळी जाधव म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील माने आणि आदित्य ठाकरे यांच्यात कधीही फरक केला नाही. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचा मान-सन्मान केला. त्यामुळे धैर्यशील माने वाटेल तेव्हा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटायला जात होते. त्यांना लागेल तसा निधी उद्धव ठाकरेंकडून दिला जात होता. तरीसुद्धा माने यांनी गद्दारी केली. त्यामुळे येत्या २५ तारखेला मी तमाम शिवसैनिक आणि मतदारांना घेऊन धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे. तसेच त्यांनी गद्दारी आणि बंडखोरी का केली? याबाबत त्यांना जाब विचारल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही” असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.