1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (15:30 IST)

अहमदनगर : हत्तीचा 5 तास नदीतच ठिय्या

ahmednagar

अहमदनगरच्या अकोले शहरात मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीला अखेर 5 तासानंतर नदीतून बाहेर काढण्यात आलं आहे. ग्रामस्थांच्या मदतीने या हत्तीला बाहेर काढण्यात यश आलं. खंडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येत आहे. या मिरवणुकीसाठी हत्तीला आणलं होतं. मात्र सकाळी हत्तीला प्रवरा नदी पात्रात डुंबण्यासाठी नेलं असता, हत्तीने 5 तास नदीतच ठिय्या मांडला. मिरवणुकीची वेळ होऊनही, काही केल्या हत्ती नदीबाहेर येतच नव्हता. त्यामुळे सकाळी सात वाजता सुरु होणारी मिरवणूक, हत्तीसाठी चार तास रखडली. मिरवणुकीचा हत्तीच नदीबाहेर न आल्याने, मिरवणूक अखेर 11 नंतर उंट-घोड्यांच्या दिमतीने मिरवणूक सुरु करण्यात आली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास हत्तीला नदीबाहेर काढण्यात यश आलं. मग त्याला सजवून मिरवणुकीत नेण्यात आल.