बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2017 (13:10 IST)

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात, 7 ठार

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो जीपने  समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.  नगर जवळील धनगरवाडी गावजवळ हा भीषण अपघात झाला. सर्व मृत पुणे जिह्यातील यवत येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण बोलेरो जीपने सैलानी बाबांच्या दर्शनाला चालले होते. रात्री दोनच्या सुमारास बोलेरो जीपच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, आणि जीपने औरंगाबादकडून नगरकडे येणा-या ट्रकला जोराची धडक दिली. मृतांची नावे अशी: मनोहर रामभाऊ गायकवाड(४५),अंकुश दिनकर नेमाने (45), मुबारक अबनास तांबोळी (52), बाळू किरण चव्हाण (50), स्वप्नील बाळू चव्हाण (17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (40) आणि अरुण पांडुरंग शिंदे.