सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (19:46 IST)

Ahmednagar : इयत्ता सातवीतल्या मुलीने बाळाला जन्म दिला

baby
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात बाभळेश्वरच्या आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात बाभळेश्वर आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीचे  दहावीत शिकणाऱ्या एका मुलाशी प्रेम संबंध जुडले. त्यांच्या मध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि मुलगी गर्भवती झाली. ही माहिती घरातील मंडळींना समजल्यावर दोघांच्या कुटुंबीयांनी एकमताने त्यांचे लग्न लावून दिले. 

प्रसूतीची वेळ जवळ आली आणि गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला. डॉक्टरना मुलीचे वय कमी असल्याचे लक्षात आले आणि त्यांनाही ही बाब पोलिसांना कळविली. नंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याचे समजले. त्यांचे जरी रीतसर लग्न झाले असले तरीही त्यांचा हा बालविवाह होता. आणि बालविवाहावर कायदशीर बंदी आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करत आहे.   
 
Edited By- Priya DIxit