संबंधित माहिती
- नांदेडच्या व्यापाऱ्याचा यूपीत अपघाती मृत्यू
- महाराष्ट्र सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये समाविष्ट नाही , सुनावणी पुन्हा लांबणीवर
- मंकीपॉक्सविरोधात महाराष्ट्रातच लस तयार होणार
- शिवसेनेच्या बालेकिल्ला असणाऱ्या भांडुपमध्ये खिंडार
- तीन दिवसांत ठाण्यात नव्या तब्बल २०० हून अधिक खड्ड्यांची भर पडली
आमदारांनी अडथळा आणल्यानंतर अजितपवार चांगलेच संतापले
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हेही आक्रमक झालेले दिसले. विशेष म्हणजे निधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलत असताना सत्ताधारी बाकावरील काही आमदारांनी अडथळा आणल्यानंतर पवार चांगलेच संतापलेले दिसले. यावेळी त्यांनी “अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?”, असा सवाल केला.
अजित पवार म्हणाले, “देवेंद्रजी मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे की आपण मनाचा मोठेपणा दाखवा. पाठीमागच्या काळात देखील २५-१५ चा निधी देण्याची कल्पना या नेत्यांच्या सुपिक डोक्यातून आली होती. २५-१५ आणि ठोक तरतूद असे निर्णय घेण्यात आले. त्याचा वापर मीदेखील मोठ्या प्रमाणात करून घेतला. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. २५-१५ चा निधी देताना आम्ही महाविकासआघाडीमधील लोकांना पाच कोटीचा निधी दिला हे मी मान्य करतो. परंतु त्याचवेळी आम्ही तुमच्याकडून याद्या घेऊन तुमच्याही आमदारांना दोन दोन कोटी रुपये दिले.”
