Ajit Pawar : लालबागच्या राजाला अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी साकडं  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळात 10 दिवसांचे उत्सव आनंदानं आणि दणक्यात साजरे केले जात आहे. गणेशोत्सव हा 10 दिवस साजरा केला जाणारा उत्सव आहे. गणेशोत्सवात प्रसिद्ध गणेश मंदिरात आणि मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात.
				  													
						
																							
									  
	
	मुंबईतील लालबागचा राजा असो किंवा सिद्धविनायक मंदिर असो. अभिनेते, बडे उद्योगपती, अभिनेत्री, राजनेते, देखील दर्शनाला जातात आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतात. नवसाला पावणारा गणपती म्हणजे लालबागच्या राजाचे भाविक  दर्शन घेऊन आपल्या मनातली इच्छा बोलतात आणि नवस करतात. 
				  				  
	 
	राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यांच्यासह अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पार्थ पवार, आणि इतर पदाधिकारी होते.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  या वेळी अजित पावर गटातील पदाधिकारी रणजित नरोटे यांनी लालबागच्या राजाच्या चरणी ''आमच्या अजितदादांना राज्याचे मुख्यमंत्री होऊ द्या ''अशी चिट्ठी अर्पण करून साकडं घातलं अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री बनावे अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते. आता लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या या चिट्ठीमुळे चर्चांना उधाण आले आहे.  
				  																								
											
									  
	 
	 
	 
	 Edited by - Priya Dixit