गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (16:04 IST)

“हे म्हणजे राज कुंद्राने कुठला चित्रपट बघावा सांगण्यासारखं,” नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांनी दिलं उत्तर

कोकण दौऱ्यात नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी जाहीर केली होती मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे करणं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सांगताना अजित पवारांनी योग्य भाषा वापरली पाहिजे असं मत मांडलं. यावर नारायण राणेंचं सुपूत्र आणि आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती.
 
कोणती भाषा वापरावी हे अजित पवार यांनी सांगणे म्हणजे राज कुंद्राने कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखे आहे असा टोला त्यांनी लगावला होता.दरम्यान नितेश राणेंच्या या टीकेवर अजित पवारांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी तुमच्यावर टीका केली आहे. त्यावर ते म्हणाले की, “कोणीही टीका करतं त्याला कितपत महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असतं. दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही”.