मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (22:24 IST)

अजित पवारांच्या शब्दाला ठाकरे सरकारमध्ये किंमत नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला सरकारमध्ये कुठलीही किंमत राहिलेली नसल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस s यांनी केली आहे. यासह देवेंद्र फडणवीस यांनी  घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्दयांवर भाष्य करत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला.
 
गेल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला अजित पवार r यांनी शेतकऱ्यांची वीज  कापणार नाही, असे म्हटले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी घुमजाव करत वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु असल्याचे सांगितले. सध्या तर शेतकऱ्यांची वीज   कनेक्शन कापण्याची स्पर्धाच सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला सरकारमध्ये कुठलीही किंमत राहिलेली नाही, हे स्पष्ट झाले असल्याची टीका त्यांनी केली. तसेच उर्जामंत्री नितीन राऊत  यांची अहंकारी वक्तव्ये पाहता राज्यात लोकशाही आहे की हुकूमशाही, असा प्रश्न पडतो. पण भाजप शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहील, असे देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितले.सरकारच्या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस  यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.