मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जुलै 2022 (13:23 IST)

Video पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा

pavankhind viral video
महाराष्ट्रात 13 जुलैला पावनखिंड रणसंग्राम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काही पर्यटकांमधील तरुणांनी मद्यपान करून तेथे चांगलाच धिंगाणा घातला तेव्हा त्यांना शिवभक्तांनी चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
 
रणसंग्राम दिवस या दिवशी हजारो शिवप्रेमी विशाळगड आणि पावनखिंडला भेट देण्यासाठी गेले असताना काही पर्यटकांमधील तरुण मद्यपान करून पावनखिंड ठिकाणी धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्यांना शिवभक्तांनी धरून जाब विचारत चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
 
या व्हिडीओमध्ये शिवभक्तांनी धिंगाणा घालणार्‍यांची चांगलीच धुलाई केल्याचे दिसून येत आहे. शिवस्थळी मद्यपी आल्याने शिवप्रेमींना संताप अनावर झाल्याने मद्यपींना चांगलीच अद्दल घडवल्याचे बोलले जात आहे. या घटनेत मद्यपींना कान पकडून माफी मागितली त्यानंतर प्रकरण शांत झाले.