शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बेळगाव , सोमवार, 24 जुलै 2023 (20:49 IST)

Amboli special bus आंबोली विशेष बस तात्पुरती स्थगित

amboli ghat
Amboli special bus वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोलीसाठी दर शनिवार आणि रविवारी सुरू करण्यात येणारी विशेष बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आंबोलीत अधिक पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे परिवहनने हा निर्णय घेतला आहे. मात्र, येणाऱ्या आठवडाभरात ही बससेवा पुन्हा सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिवहनने गोकाक आणि आंबोली धबधब्यासाठी दुसरा, चौथा शनिवार-रविवार आणि शासकीय सुटीदिवशी विशेष बससेवा सुरू केली आहे. यापैकी गोकाकसाठी रविवारी विशेष बस सुरळीत धावली. मात्र, अतिवृष्टीमुळे आंबोलीकडे धावणारी बस थांबविण्यात आली आहे. मात्र, येत्या शनिवारी आणि रविवारी ही बस धावणार आहे. वर्षा पर्यटनासाठी धबधब्यांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. दरम्यान, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने गोकाक आणि आंबोली धबधब्यांना विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. गतवर्षी या बससेवेला उदंड प्रतिसाद मिळाला होता.