सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2023 (20:43 IST)

Nashik News पत्नीचे प्रियकरासमवेत पलायन; पतीची आत्महत्या

suicide
सिडकोत राहणाऱ्या विवाहितेने तीन मुले व पतीला सोडून प्रियकरासमवेत पलायन केले. पत्नीच्या या कृत्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या पतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संशयित पत्नीविरुद्ध पतीस आ त्म ह त्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सतीश रमेश लोहार (३८, रा. सिडको, नाशिक. मूळ रा. पाडळसा, ता. यावल, जि. जळगाव) असे मयत पतीचे नाव आहे. जागृती सतीश लोहार (३३), असे संशयित पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागृतीचा विवाह २००६ मध्ये सतीश यांच्याशी झाला होता.
त्यानंतर त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. सतीश हे खासगी कंपनीत नोकरी करून उदरनिर्वाह करीत होते. काही वर्षांपासून जागृती हिचे ओळखीतील तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. यावरून पती- पत्नीत वाद होत होते.
सतीशने बऱ्याच वेळी जागृतीला समजावून सांगितले. तरी तिने प्रियकराचा नाद सोडला नाही. अखेरीस पत्नी जागृती हिने मुलाबाळांना वाऱ्यावर सोडून प्रियकरासमवेत पळून गेल्याचे त्यांना सहन झाले नाही.
यातून त्यांनी गेल्या २ जुलैला सिडकोतील घरात गळफास घेत जीवन संपविले, अशी फिर्याद सतीश यांचे वडील रमेश कडू लोहार (रा. पाडळसा, ता. यावल) यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिली आहे.
 
त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील बिडकर करत आहेत. सध्या या प्रकरणात जागृती व तिच्या प्रियकराचा शोध अंबड पोलिस घेत आहेत.