शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 फेब्रुवारी 2024 (09:10 IST)

अमोल येडगे नवे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची बदली झाली असून कोल्हापूरला अमोल येडगे हे नवे जिल्हाधिकारी मिळणार आहेत. राहूल रेखावार यांची बदली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण मंडळाच्या संचालकपदावर झाली आहे.
 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) संचालकपदी कार्यरत असलेले अमोल येडगे  यांनी यवतमाळच्या येथे जिल्हाधिकारीपदाचीही सांभाळली होती.
 
गेल्या वर्षभरापासून राहूल रेखावार यांच्या बदलीच्या चर्चा सुरू होत्या. कोल्हापूरचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. जिल्हाधिकारी यांची बदली व्हावी यासाठी कोल्हापूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी लावून धरली होती. त्यानंतर आज त्या संदर्भातील शासनाचे परिपत्रक निघाले आहे.
 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर राहूल रेखावार यांची बदली झाली असून ते आता परिषदेचे संचालक म्हणून काम करतील. याच संस्थेवर अमोल येडगेही कार्यरत असून दोन जिल्हाधिकाऱ्यांची आदलाबदली झाली असे म्हणता येईल.