1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (08:50 IST)

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाची घोषणा, परीक्षा 'अशा' होणार

important announcement
अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेणार तसंच निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लाऊ, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. प्रत्येक कुलगुरूंनी परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबतचा आपला अहवाल समितीसमोर ठेवला, घरात बसूनच परीक्षा घेण्यास राज्यपालही राजी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. 
 
१५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाच संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावं, असं आवाहनही उदय सामंत यांनी केलं. प्रॅक्टिकल परीक्षासुद्धा फिजिकली करायला लागू नये, अशी पद्धत अवलंबणार असल्याचं त्यांनी  सांगितलं. 
 
परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे. परीक्षा मात्र सोप्या पद्धतीने होतील यावर एकमत आहे. दुसरीकडे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय करायचं, याबाबतही आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ, राज्यपाल आणि आमच्यात विसंगती नाही. आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहोत, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं.