बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (14:48 IST)

Rape of a minor girlअल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना

rape
नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंबड परिसरात शेजारी राहणाऱ्या तरुणानेच घरात खेचत नेऊन बलात्कार केला आहे. घटना घडली त्यावेळी मुलगी घरात एकटी होती. याचाच फायदा घेत संशयितांने तीला बळजबरीने शेजारीच असलेल्या त्याच्या घरात घेऊन गेला व मुलीच्या इच्छेविरोधात अत्याचार केला. महिन्याभरात घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे नवीन नाशिक परिसरात महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
याप्रकरणी अंबड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी पीडितेच्या घरा शेजारीच रहातो. पीडित मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिच्या राहत्या घरात घुसला, तीच्या मनाविरुद्ध हात पकडुन, खेचत स्वतःच्या घरी घेऊन गेला. तीला दमदाटी करून  तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या पालकांना माहिती मिळताच त्यांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
असून संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.