शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (23:41 IST)

चंद्रपूर : वडिलांनी विष पाजून दोन्ही मुलांची हत्या केली,आरोपी वडील फरार

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहराजवळ असलेल्या बोर्डा गावात दोन मुलांना विष पाजून त्यांची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुमित अजय कांबळे (7) आणि मिस्टी संजय कांबळे(3)अशी मृत मुलांची नावे असून मुलांचा आरोपी वडील संजय कांबळे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डागावात संजय श्रीराम कांबळे हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून शिकवणी घेण्याचे काम करत होता. कोरोनापासून त्याचे शिकवणीचे वर्ग त्याची मानसिक अवस्था ढासळल्या मुळे बंद होते. संजय यांची पत्नी कंत्राटी तत्वावर एका कॉलेजमध्ये काम करत असे. ती कॉलेजात कमला गेली असता आरोपी संजयने आपल्या दोन्ही चिमुकल्यांचे विष  पाजून त्यांची हत्या केली. पत्नीने घरी आल्यावर आपल्या मुलांना बेडवर निपचित पडलेले पहिले आणि आरडाओरड सुरु केला आणि शेजाऱ्यांना बोलविले नंतर शेजाऱ्यांनी मुलांना तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आईने मुलांच्या मृत्यूचे समजतातच हंबरडा फोडला. या  घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर आरोपी संजय फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.