बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (21:35 IST)

करमाळ्यात शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह 20 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

shivsena
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेतून मोठी गळती लागली आहे. आता युवासेनेला मोठा धक्का बसला असून युवासेनेचे तालुका प्रमुख शहर प्रमुखांनी पक्षेतून राजीनामा दिला आहे. सध्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती सुरु असून अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.  

युवासेनेचे करमाळा तालुक्यातील प्रमुख राहुल कानगुडे व शहर प्रमुख विशाल गायकवाड यांच्यासह 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा पक्षातून राजीनामा देत रामराम केला आहे. विशाल गायकवाड यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या राजकारणाला कंटाळून शिवसेनेचा पक्ष सोडल्याचे सांगितले. 
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत, आणि त्यांच्याविचारानं समोर ठेवूनच काम करण्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आता हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरु झाली आहे.