बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:35 IST)

आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्याकडून मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा उल्लेख

devendra fadnavis
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. महत्वाची बाब म्हणजे भर सभेत दत्तामामांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांचाच मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलाय! जेव्हा स्टेजवर उपस्थित असलेल्यांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा मात्र त्यांनी आपली चूक सुधारली.
 
 इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. तसंच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात करताना राज्यमंत्री भरणे यांना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ दत्तामामांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर दत्तामामांनीही आपली चूक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला. मात्र, दत्तामामा यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानं उपस्थितांमध्ये काही काळ खळबळ आणि हशाही पिकला.