शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अण्णा हजारेंनी दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा

केंद्र सरकारने लोकपाल नियुक्ती न केल्यास पुन्हा रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्याची सरकारची इच्छा नाही, हा जनतेच्या भावनांचा अपमान असून लोकपालसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे. असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी भ्रष्टाचार संपवण्याचं आश्वासन निवडणुकीत दिलं होतं. त्याचा त्यांना विसर पडला आहे, अशा तीव्र शब्दात अण्णा हजारेंनी केंद्र सरकारवर टीका केली. लवकरच पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आंदोलनाची तारीख जाहीर करेन,' असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.