मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (17:43 IST)

अण्णांच्या उपोषणाला सुरूवात, महाजन यांना भेटण्यास दिला नकार

नरेंद्र मोदी सरकारची  भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची या सरकारची इच्छा नाही अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथून केली आहे. लोकपाल, लोकायुक्त जनतेच्या हातात आहे. जनतेने पुरावे दिल्यानंतर पंतप्रधानांच्या घोटाळ्याची चौकशी लोकपाल करु शकते. तसेच राज्यामध्ये लोकायुक्त ही कामगिरी करेल. 4 वर्षै झाली पण हे सरकार कार्यवाही करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. लोकपाल नियुक्तीसाठी राळेगणसिद्धी येथे सुरू होत असलेले उपोषण मागे घेण्याची विनंती अण्णांनी फेटाळली आहे. अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम असून राळेगणसिद्धी येथे अण्णांच्या उपोषणाला सुरूवात झाली आहे. 
 

अण्णांची समजूत काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे राळेगणसिद्धीच्या दिशेने रवाना झाले. पण आपण उपोषणावर ठाम असल्याचे अण्णांनी कळवल्यानंतर महालक्ष्मी हॅलीपॅडवरूनच जलसंपदा मंत्री महाजन परतले आहे. राळेगणसिद्धी वासियांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.