सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (14:17 IST)

Another Manoj Jarange Patil आणखी एक मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange duplicate
social media
मनोज जरांगे पाटील यांचं नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे कारण त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला आहे. जालन्याचे आंतरवली सराटी गावाचे मनोज जरांगे पाटील यांना मराठा योद्धाही म्हटलं जातं आहे. त्यांनी आता गावागावांमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच चर्चा सुरू आहे की आणखी एका मनोज जरांगे पाटील यांची. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखेच दिसणारे तुळशीराम गुजर हे अकोल्यातल्या मराठा मोर्चाच्या सभेग सहभागी झाले आहेत. 
 
 सकाळपासूनच त्यांच्यासह सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली आहे. ते मनोज यांच्यासारखाच वेश परिधान करून निघाले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली. ते म्हणाले काही दिवसांपूवी मला मित्रांनी सांगितले की तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसता. मला विश्वास बसला नाही. मोबाईलवर त्यांचा फोटो आणि माझा फोटो दोनही पाहिले तेव्हा विश्वास बसला की मी मनोज जरांगे यांच्यासारखा दिसतो याचा मला आनंद आहे. सध्या रस्त्यावरून जातो तेव्हा लोक माझ्यासह फोटो काढण्यासाठी गर्दी करतात.