शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जून 2023 (20:48 IST)

नाहीतर माफी मागा, तुषार भोसले यांचे शरद पवारांना आव्हान

Tushar Bhosle
Apologize otherwise Tushar Bhosles challenge to Sharad Pawar शरद पवार खोट्या माहितीच्या आधारे कांगावा करत आहे. त्यामुळे मी भोसले नसल्याचा एक तरी पुरावा द्या, नाहीतर माफी मागा, असे आव्हान तुषार भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे. काल शरद पवार यांनी केलेल्या नावाबाबतच्या प्रश्नांवर भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. 
 
याआधी शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत असताना पत्रकाराच्या प्रश्नांवर उत्तर देताना म्हणाले होते की, संभाजी भिडे, तुषार भोसले यांची नावे आधी तपासून घ्या, शाळेत जाऊन या नावांबाबत विचारणा करा, ही नाव बदललेली माणसे आहेत. 
 
तुषार भोसले यावेळी म्हणाले की, शरद पवार हे देशाचे मोठे नेते असून माझा समज होता की, एखादे वक्तव्य करताना ते खात्री करतात. पण काल माझा गैरसमज दूर झाला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझे आडनाव भोसले नसल्याचे व्हायरल होत होते. माझ्या मनात याचा मास्टरमाईंड कोण, याचा शोध होता. काल एकादशीच्या दिवशी याचा मास्टर माईंड शरद पवार असल्याचे समजले, असा घणाघात भोसले यांनी केला.  
 
ते पुढे म्हणाले की, आम्ही जे धार्मिक काम सुरू केले आहे. तुम्ही तात्विक विरोध करू शकत नाही, म्हणून तुम्ही जातीचे शस्त्र काढले. शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांला उत्तर देण्यासाठी आज पुरावे आणले आहे. शाळा सोडल्याचा दाखला आणला असून यात स्पष्ट लिहले आहे की, भोसले माझे आडनाव आहे. धर्म आणि जात मराठा असून डंके की चोट पे, सांगतो मी मराठा असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
 
मी अमळनेरचा असून संपूर्ण अमळनेर गाव हे एकाच भोसले कुळाचे आहे. मी भोसले नसल्याचा एक तरी पुरावा द्या, नाहीतर माफी मागा, असे आव्हान तुषार भोसले यांनी शरद पवार यांना दिले आहे. तसेच मी हे सगळे पुरावे सिल्व्हर ओक बंगल्यावर पाठवणार असल्याचे ते म्हणाले.