अडसूळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच ईडी ताब्यात घेणार
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत होती. परंतु चौकशी दरम्यान त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील लाईफलाईन केअर रुग्णालयात अडसूळ यांना दाखल करण्यात आले आहे.अडसूळ यांची ईडी चौकशी करण्यासाठी ईडीचा एक अधिकारी सध्या रुग्णालयातच उपस्थित आहे. ज्या क्षणी अडसूळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल तेव्हा ईडी त्यांना ताब्यात घेईल असे सांगण्यात येत आहे. सोमवारी ईडीचे पथक अडसूळ यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले होते. चौकशीसाठी अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतलं होते अशा चर्चा रंगू लागल्या होत्या परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून त्यांची ईडी चौकशी सुरु आहे. अडसूळ यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे एक पथक मुंबईतील घरी दाखल झाले होते. यावेळी ईडीने चौकशीदरम्यान त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली होती. परंतु चौकशीदरम्यान त्यांची तब्येत बिघडल्यामुळे रुग्णावाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अडसूळ सध्या रुग्णालयातच असून त्यांना सोडल्यावर ताक्काळ ईडी चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी ईडीचा एक अधिकारीही रुग्णालयात हजर आहे.