शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 जुलै 2022 (10:28 IST)

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : शिंदे गटाचा व्हीप जारी, 'नार्वेकरांना मतदान करा' असे आदेश

vidhan
Maharashtra Assembly Speaker Election :विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस या नव्या सरकारची आज विधानसभेत पहिली परीक्षा असेल. कारण आज विधानसभेत अध्यक्षांची निवड केली जाणार असल्यानं शिंदे-फडणवीस सरकारला आपल्या बाजूला बहुमत गाठणारं संख्याबळ दाखवावं लागणार आहे.आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असून पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
 
गेल्या 11 दिवसात सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास करत बंडखोर आमदार अखेर मुंबईत दाखल झालेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 39 शिवसेनेचे बंडखोर आमदार, तर 7 अपक्ष बंडखोर आमदार आहेत.
 
गुवाहाटीहून गोव्यात दाखल झालेल्या या बंडखोर आमदारांना स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत घेऊन आले. मुंबईतील ताज प्रेसिंडेट हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबले आहेत.
 
बंडखोर आमदारांच्या प्रवासादरम्यान कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी मुंबईत पोलिसांचा विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.