अवनीची शिकार नियम धाब्यावर बसवून केली
अवनी वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी NTCA चा अहवाल आलाय. या अहवालात अवनीची हत्या केल्याचंच स्पष्ट होत आहे. अवनी वाघिणीच्या शिकारीप्रकरणी NTCA अर्थात नॅशनल टायगर Conservation अॅथोरिटीचा अहवाल प्राप्त झालाय. २ नोव्हेंबरला यवतमाळमधल्या राळेगावच्या जंगलात अवनी वाघिणीला ठार करण्यात आले होते. अवनीची शिकार नियम धाब्यावर बसवून केल्यावर आता शिक्कामोर्तब झाल आहे.
अवनीला जेरबंद करणं योग्य नियोजनमुळे शक्य झालं असतं, मात्र तसा प्रयत्नच झाला नाही, तिला ठार मारण्यापूर्वी तिला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. एखाद्या प्राण्याला ठार मारताना पशुवैद्यकीय अधिकारी सोबत असावा लागतो. मात्र अवनीला मारताना हा अधिकारी बरोबर नव्हता, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय.
वाघाला बेशुद्ध करण्यासाठीचे औषध २४ तासच गुणकारी असतं,अवनीला बेशुद्ध करण्यासाठी वापरलेल्या डार्टमधलं औषध ५६ तास आधीचं होते, अशी धक्कादायक माहिती या अहवालातून पुढे आलेय. पशुवैद्यकीय पथक आणि अवनीला जेरबंद कऱण्यासाठी गेलेल्या टीममध्ये समन्वयाचा अभाव होता, असाही ठपका ठेवण्यात आलाय.