यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात येत्या ७ डिसेंबरपासून युवक महोत्सवाला सुरुवात होणार आहे. यंदाचा हा १६ वा महाराष्ट्र राज आंतरविद्यापीठ युवक महोत्सव असून ‘इंद्रधनुष्य- २०१८’ असे या महोत्सवाचे नाव आहे. ७ ते ११ डिसेंबर असा ५ दिवस चालणारा हा महोत्सव असून संपूर्ण राज्यातल्या २० विद्यापीठातील ८०० हून अधिक विद्यार्थी कलाकार यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे.
अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. ई. वायुनंदन हे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे आमदार मा. बाळासाहेब सानप व आमदार मा. देवयानी फरांदे हे उपस्थित राहणार आहेत. हा संपूर्ण महोत्सव मुक्त विद्यापीठाच्या प्रशस्त आवारात होणार असून, महोत्सवात संपूर्ण राज्यातील २० विद्यापीठातील ८०० हून अधिक विद्यार्थी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ चे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. यापूर्वी सन २००८ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात हा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला होता. गेल्या वर्षी परभणी येथे ‘इंद्रधनुष्य – २०१७’झाला. यंदाच्या १६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य – २०१८’चे आयोजन विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या नेतृत्वाखाली मुक्त विद्यापीठात करण्यात आले आहे. सांस्कृतिक शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसंगीत – नृत्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद, वक्तृत्व, शास्त्रीय नृत्य - गायन व वादन, पाश्चात्य गायन, मृद्कला, रांगोळी, कोलाज, व्यंगचित्रकला, मुक अभिनय, एकांकिका, लघुनाटीका, भित्तीचित्र, स्पॉट फोटोग्राफी, ऑन दि स्पॉट पेंटिंग आदी विविध कलाप्रकारांचे स्पर्धात्मक सादरीकरण होईल. यंदाच्या महोत्सवासाठी विद्यापीठाने खास नवीन बोधचिन्ह (लोगो) तयार केले आहे. महोत्सवासाठी येणार्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया विद्यापीठ आवारातील कृषी विज्ञान केंद्र येथे येत्या गुरुवार दि. ६ डिसेंबर दुपारी १२ वाजेपासून शुक्रवार दि. ७ डिसेंबरला सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू राहिल.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
७ डिसेंबर २०१८ – सकाळी ९.३० ते १०.३०- सांस्कृतिक शोभायात्रा
सकाळी ११ वाजता- उद्घाटन सोहळा
संध्याकाळी ७.३०वाजता – लोकसंगीत- नृत्य
रात्री ८ वाजता – प्रश्नमंजुषा
८ डिसेंबर २०१८- सकाळी १० ते दुपारी १२ – वादविवाद स्पर्धा
दुपारी २ ते सायंकाळी ५.३० एकल शास्त्री वाद्य स्पर्धा
दुपारी १ ते ३.३० वाजता- कोलाज स्पर्धा
दुपारी ३.३० ते रात्री ९,३० वाजता – एकांकिका स्पर्धा, पाश्चिमात्य समूह गायन स्पर्धा
९ डिसेंबर २०१८- सकाळी १० ते दुपारी १.३० वाजता- वक्तृत्व स्पर्धा, एकल पाश्चिमात्य गायन
सकाळी ९ ते दुपारी १ – शास्त्रीय नृत्य, भिंतीचित्र स्पर्धा, शास्त्रीय वाद्य संगीत स्पर्धा
दुपारी १ ते ३.३० – मूक अभिनय , मृद्कला स्पर्धा
१० डिसेंबर २०१८ – सकाळी ९ ते दुपारी १ – समूहगीत गायन
सकाळी ९.३० ते ११.३०- नकला स्पर्धा, स्पॉट फोटोग्राफी
सकाळी १० ते दुपारी ३ – लघुनाटिका स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ऑन द स्पॉट पेंटिग स्पर्धा
११ डिसेंबर २०१८- बक्षीस समारंभ आणि समारोप