शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (15:51 IST)

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाविषयी सध्या सुरु असलेला वाद, मात्र त्याचे महत्व व महात्म्य काय याबद्दल संपूर्ण माहिती

संपूर्ण भारतात 12 ज्योतिर्लिंग म्हणजेच भगवान शंकराची प्रमुख मंदिरे आहेत. पण आसाम सरकारच्या एका दाव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. आसाम सरकारने सहाव्या ज्योतिर्लिंगाबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काँग्रेसने आसाम सरकारवर जोरदार टीका केली.
 
नेमका वाद काय ?
आसाम सरकारच्या पर्यटन विभागाने एक जाहिरात काढली आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला की, देशातील सहावे ज्योतिर्लिंग राज्याच्या डाकिनी टेकडीवर वसलेले आहे. ही जाहिरात येताच महाराष्ट्राचे राजकारण तापले. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्विट करुन आसाम सरकारचा समाचार घेतला. मूळात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असलेले ज्योतिर्लिंग हे देशातील सहावे ज्योतिर्लिंग म्हणून आधीच ओळखले जाते.
 
आध्यात्मिक वारशाची चोरी
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत आसाम सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न ठेवण्याचा भाजप नेत्यांचा निर्धार आहे का? आधी महाराष्ट्रातील उद्योग आणि रोजगार चोरीला गेला आणि आता आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा चोरीला जाणार आहे….! असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 
बारामधील सहावे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर, कुंभकर्णाच्या मुलामुळे झाली याची स्थापना
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पुण्यापासून 127 किमी अंतरावर असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत.
जाणून घ्या, कसे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर-
भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं दिसून येते. मंदिर परिसरात शनि मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो.
 
असे स्थापित झाले भीमाशंकर ज्योतिर्लिंग-
प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली, काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला. रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजे. त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले. 
 
त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता. एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. यामुळे क्रोधीत झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्याने शिवलिंगातुन स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले. युद्धमध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले.
 
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते.
हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
 
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
 
· गुप्त भीमाशंकर -भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
 
· कोकण कडा-भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.
 
· सीतारामबाबा आश्रम- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
 
· नागफणी - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
भीमाशंकर मंदिराचे वैशिष्ट्ये -
भीमाशंकर मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र महाराष्ट्रातील सह्याद्री नावाच्या डोंगरावर स्थित असून हे पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण नाशिक पासून जवळपास १२० मैल वर आहे.‌ हे मंदिर भारतात आढळणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. या मंदिरातील शिवलिंग ३.२५० फिट च्या ऊंचाई वर स्थित आहे. मंदिरातील शिवलिंग अतिशय मोठा आहे, म्हणूनच त्याला मोटेश्वर महादेव म्हणून हि ओळखलं जातं. हे स्थान भाविक तसेच ट्रॅकर प्रेमींसाठी उपयुक्त आहे. हे मंदिर पुण्यात अतिशय प्रसिद्ध आहे जगभरातील लोक या मंदिराच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी येथे येतात. भीमाशंकर मंदिराजवळील कमळजा मंदिर आहे. हे कमळजा पार्वतीचा अवतार असून या मंदिरातही भाविकांची गर्दी असते.
 
भीमाशंकर मंदिराचे रहस्य-
या मंदिराजवळून भीमा नावाची नदी वाहते. जी पुढे जाऊन कृष्णा नदीला जोडली जात. पुराणात असा समज आहे की जो फक्त दररोज सकाळी या मंदिरात सूर्य उदय झाल्यानंतर या मंदिरास श्रद्धेने भेट देतो आणि बारा ज्योतिर्लिंगांची नावे सांगतो त्याचे सात जन्मातील पाप काढून टाकले जातीलआणि स्वर्गात जाण्यासाठी त्याचे मार्ग उघडले जातात.
 
भीमाशंकर मंदिर उत्सव आणि यात्रा-
शंकर मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्रीला इथे भाविकांचा कल्लोळ असतो. भाविकांच्या मोठ्यात मोठ्या रांगा लागतात प्रत्येक वर्षी येणारी महाशिवरात्र येथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. महाशिवरात्रि शिवाय इथे इतर धार्मिक उत्सव देखील साजरे केले जातात.
 
भीमाशंकर मंदिर कोठे आहे? कसे जायचे?
भीमाशंकर हे मंदिर पुण्यामध्ये स्थित आहे. एयर मार्गे भीमाशंकर ज्योतिर्लिंग पासून सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे आहे. पुण्याहून भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे अंतर अंदाजे ११० किलोमीटर आहे. रेल्वे मार्गे भीमाशंकरचे कोणतेही रेल्वे स्टेशन नाही आहे. पुणे हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. ते भीमाशंकर पासून १६८ किलोमीटर दूर आहे. रेल्वेस्थानकावर इथून पुढे भीमाशंकरला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहेत. भीमाशंकर रस्ता विविध शहरांशी जोडला आहे. हे अंतर भीमाशंकर ते पुणे ११० किलोमीटर, नाशिक २०६ किलोमीटर, मुंबई १९६ किलोमीटर आहे.
 
भीमाशंकर मंदिर वेळ
इथे येणारे यात्रेकरू किमान तीन दिवस नक्कीच मुक्काम करतात. भाविकांना येथे राहण्यासाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था केल्या आहेत. शिनोली आणि घोडगाव हे भीमाशंकर पासून थोड्या अंतरावर आहे. जिथे आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील तर भीमाशंकर मंदिरात जायचे असेल तर ऑगस्ट फेब्रुवारी महिन्यात जा तसेच आपण उन्हाळ्याच्या हंगामा शिवाय कोणत्याही वेळी जाऊ शकतो. तसेच ज्यांना ट्रेकिंग आवडते त्यांनी पावसाळ्यात जाणं ‌टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंदिर उघडण्याची वेळ पहाटे साडेचार वाजताची आहे.
 
त्यानंतर पहाटे सकाळी ४.४५ ते ५ पर्यंत च्या दरम्यान पंधरा मिनिटांची आरती होते. निजरूप दर्शन म्हणजेच मूळ शिवलिंगाच्या दर्शनाची वेळ सकाळी ५ ते ५:३० म्हणजेच अर्ध्या तासाची असते. दर्शनी अभिषेक पहाटे ५:३० ते दुपारी २:३० पर्यंत चालू असते. नैवेद्य पूजा दुपारी १२ वाजल्यापासून रात्री १२:३० पर्यंत चालू असतं. या वेळेमध्ये अभिषेक केला जात नाही. आरती दुपारी ३ ते ३:३० पर्यंत असते. शृंगार दर्शन ३:३० ते ९:३९ पर्यंत असत. आरती संध्याकाळी ७:३० ते ८ वाजेपर्यंत होते.
 
पाहण्यासारखी ठिकाणे- 
कोकण कडा भिमाशंकर मंदिरा जवळच पश्चिमेस एक कडा आहे त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. या कड्यावरून अतिशय रमणीय असे दृश्य दिसते. इथल्या स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबी समुद्र देखील दिसू शकतो. हा कडा पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो. तुकाराम बाबा आश्रम पासूनच पुढे एक रस्ता या आश्रमाकडे जातो. अतिशय घनदाट जंगलात हे ठिकाण आढळून येईल या ठिकाणी आपण आपल्या प्रायव्हेट गाडी ने देखील पोहोचू शकतो.

Edited by: Ratnadeep Ranshoor