मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (15:38 IST)

राज्य सरकारचा मोठा निर्णय :पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींची मदत जाहीर

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात कोरोनाने आणि पावसाने उच्छाद मांडला आहे.कोरोना आणि पावसामुळे अनेक लोकांचे घर उध्वस्त झाले.यंदा पावसामुळे येणाऱ्या महापुराने अनेक घरांना उध्वस्त केले.लोकांची जनावरे,पीक नष्ट झाले.घर कोसळून बरेच मृत्युमुखी झाले.या परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आणि आपल्याला मदत केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
 
आज राज्य सरकार ने ही मदत जाहीर केली आहे.पूरग्रस्तांना झालेल्या नुकसानाची भरपाई आणि घराचे पुनर्वसन करण्यासाठी  म्हणून 11 हजार 500 कोटी रुपये खर्च करण्याची मंजुरी देण्यात आली.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत सादरीकरण केले असताना याला मान्यता देण्यात आली.