शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (09:32 IST)

विज्ञान शाखेसाठी बायोमेट्रिक्स हजेरी

राज्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे दांडी मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. आता या दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी विज्ञान शाखेच्या आता प्रत्येक विद्यार्थ्याची आता बायोमेट्रिक्स हजेरी घेण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. बायोमेट्रिक्स हजेरी न घेणाऱया कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता रद्द होईल.
 
शिक्षण विभागाच्या या बायोमेट्रिक हजेरीच्या निर्णयामुळे कोचिंग क्लासवाल्यांना दणका बसला आहे. मान्यता रद्द होऊ नये म्हणून कनिष्ठ महाविद्यालयांना आता बायोमेट्रिक मशीन्स लावाव्याच लागणार आहेत आणि बायोमेट्रिक हजेरी लावणे विद्यार्थ्यांना अनिवार्य होणार आहे. ठरावीक तासांची उपस्थिती त्यांना लावावी लागणार असून त्याची अचूक नोंद बायोमेट्रिकमुळे ठेवता येणार आहे. राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक्स पद्धतीने हजेरी घेण्यात येईल.