बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (08:47 IST)

अंबाबाईच्या सेवेत सर्व जातीचे पुजारी नेमणार

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार आहेत. याबाबत देवस्थान समितीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता पगारी पुजारीपदासाठी 113 अर्ज आले आहेत. त्यापैकी सहा अर्ज हे महिला पुजाऱ्यांचे असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. सध्या मंदिरात कामकाजासाठी 55 पुजाऱ्यांची गरज आहे. आता मंदिरात असणाऱ्या एकाही पुजाऱ्याने अर्ज केलेला नाही.
 
दुसरीकडे, अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप पुजारी हटाव कृती समितीनं केला आहे. पगारी पुजारी नेमण्याच्या मुलाखती झाल्याच तर त्या उधळून लावण्याचा इशाराही कृती समितीनं दिला आहे.