मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (15:22 IST)

भाजप नेते अद्वय हिरे २७ जानेवारीला बांधणार शिवबंधन

uddhav
नाशिक : ठाकरे गटात बंड करून शिंदे गटात गेलेले नेते तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे  यांना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (धक्के देण्याच्या तयारीत आहेत. कारण नाशिकमधील भाजप युवा मोर्च्याचे नेते डॉ. अद्वय हिरे हे भाजपला जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्री येथे २७ जानेवारीला हा पक्षप्रवेश होणार आहे. डॉ.अद्वय हिरे यांच्यासोबत मालेगावमधील हजारो कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.
 
ही बातमी पण वाचा : भाजप सोडून ठाकरे गटात जाणाऱ्या अद्वय हिरे यांची सत्यजित तांबे घेणार…
 
डॉ.अद्वय हिरे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घेऊन त्यांनी भाजपला सोडचिट्ठी देत असल्याचे जाहीर केले होते.
 
ठाकरे गटात बंड करून दादा भुसे शिंदे गटात गेल्यामुळे नाशिकमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याचाच फायदा डॉ. हिरे यांना होणार असल्याची चर्चा आहे. डॉ. हिरे हे हजारो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने मालेगावात भाजपची ताकद कमी होणार असून ठाकरे गटाला दादा भुसे यांच्याविरोधात मोठा फायदा होणार आहे. दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये मालेगावात दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor