शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2019 (08:57 IST)

भाजपा कार्यालय उद्घाटन भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद

मानापमानाचं देण्याच होणारे नाट्य नेहमी राजकारणात पाहायला मिळते. जर एखाद्या कार्यक्रमात जर नाव नसेल तर अनेकदा वाद होतात असाच प्रकार मुंबईत घडला आहे तोही भाजपा कार्यकर्त्यानमध्ये. भाजप पदाधिकाऱ्यांमधील मानापमान नाट्य इतके टोकाला गेले की, हाणामारीपर्यंत पोहोचले होते. कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत तुफान मारामारी खील केली आहे. भाजप कार्यकर्त्यांचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. मुंबई येथील मानखुर्द लिंक रोडवर मानखुर्द मंडाला येथे भाजपच्या कार्यालयाच्या उद्घाटन होणार होते, यावेळी मान्यवरांच्या स्वागत करणाऱ्यांच्या यादीत भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटोळे यांचे नाव मंडल अध्यक्ष हेमंत भास्कर यांनी घेतले नाही. या सर्व प्रकारचा राग आल्याने पाटोळे यांनी भास्कर यांना शिवीगाळ करीत त्यांना हाणामारी केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. या हाणामारीप्रकरणी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला मात्र याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.