शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (08:46 IST)

लोकसभेत मनसे प्रमुख घेणार सभा पहिल्या सभेसाठी नांदेडकडे रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा झंझावात शुक्रवारपासून सुरु होतोय. नांदेडमधील पहिल्या सभेसाठी ते मुंबईहून देवगिरी एक्स्प्रेसने गुरुवारी रात्री नऊ वाजता रवाना झाले. मनसेचे त्यांचे सहकारीही त्यांच्यासोबत आहेत. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. नांदेडचाही यामध्ये समावेश आहे. त्यापूर्वी राज ठाकरे सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढणार आहेत. यापैकी पहिल्या सहा सभांचे वेळापत्रक मनसे पक्षातर्फे अधिकृत जाहीर करण्यात आले आहे. यातून आघाडीच्या उमेदवारांचा फायदा झाला तरी चालेल मात्र मोदी आणि शहा या जोडगोळीला भारतीय राजकारणाच्या क्षितिजावरून खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
 
असे आहे वेळापत्रक :
 
सभा क्रमांक 1 
 
दि. 12 एप्रिल : नांदेड 
ठिकाण : नवीन मुंडा मैदान 
आघाडीचे उमेदवार : अशोक चव्हाण, काँग्रेस 
युतीचे उमेदवार : प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा 
 
सभा क्रमांक 2 
 
दि. 15 एप्रिल : सोलापूर
ठिकाण : कर्णिक नगर क्रीडांगण संध्याकाळी 5.30 वाजता
आघाडीचे उमेदवार : सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस 
युतीचे उमेदवार : डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, भाजपा 
 
सभा क्रमांक 3 
 
दि. 16 एप्रिल : कोल्हापूर 
ठिकाण : यशोलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळचे मैदान, वेळ संध्याकाळी 5.30 वाजता आघाडीचे उमेदवार : धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस 
युतीचे उमेदवार : 
 
सभा क्रमांक 4
 
दि. 17 एप्रिल : सातारा 
ठिकाण : जुन्या राजवाड्यासमोरील गांधी मैदान सायंकाळी 5.30 वाजता 
आघाडीचे उमेदवार : उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस 
युतीचे उमेदवार : नरेंद्र पाटील, भाजपा 
 
सभा क्रमांक 5 : दि. 18 एप्रिल : पुणे 
 
ठिकाण : सिंहगड रोडवरील शिंदे मैदान 
आघाडीचे उमेदवार : पुणे : मोहन जोशी 
बारामती : सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस 
मावळ : पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस 
युतीचे उमेदवार : पुणे : गिरीश बापट, भाजप 
बारामती : कांचन राहुल कुल, भाजपा 
मावळ : श्रीरंग बारणे, शिवसेना 
 
सभा क्रमांक 6 
 
19 एप्रिल : महाड, रायगड 
ठिकाण : महाडमधील चांदे मैदान 
आघाडीचे उमेदवार : सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार : अनंत गीते, शिवसेना