कोल्हापुर: चार महिन्यापूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणीचा आढळला मृतदेह
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक बातमी कोल्हापुर शहरातून समोर आली आहे. कोल्हापूरच्या शनिवार पेठ परिसरातील एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या घरातील सदस्यांना ताब्यात घेतले आहे. या तरुणीच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या शनिवार पेठ परिसरातील वैष्णवी लक्ष्मीकांत उर्फ बाळु पवार या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिच्या आईसह भावास ताब्यात घेतल्याचे समजते. वैष्णवीच्या मृत्यूचे करण अजून स्पष्ट झालेले नाही. या तरुणीच्या अंगावर मारहाणीचे वळ असल्याने तिचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वैष्णवी यांच्या कुटुंबीयांचे चप्पल लाईनला व्हरायटी लेदर नावाचे चप्पल दुकान आहे. तसेच वैष्णवी ही एका खासगी बँकेत नोकरी करत होती. तसेच तिचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा झाल्याचे समजते. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor