शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (11:31 IST)

हुंडा घेऊन लग्नापूर्वीच नवरा पळाला

सोलापूर- 2 लाख 75 हजार रुपये हुंडा घेतला मग लग्नपत्रिकाही वाटल्या परंतु नवरोबांनी ऐन लग्नाच्या तोंडावर पळ काढला. ही घटना तांबेवाडी, ता. बार्शी येथे घडली आहे असून याप्रकरणी नवरा आकाश जाधव व त्याचे वडील नामदेव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुलीच्या वडिलांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिली आहे.
 
फिर्यादी यांची मुलगी व नामदेव जाधव यांचा मुलगा आकाश या दोघांचा लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम 21 फेब्रुवारी रोजी मुलीच्या घरी झाला. तेव्हा चव्हाण यांनी नवदेव मुलगा आकाश यास एक तोळा वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या व त्याचे वडील नामदेव दगडू जाधव यांना दोन तोळ्याची सोन्याची चेन असे एकूण अडीच लाख रुपयांचे पाच तोळे सोने व रोख 25 हजार रुपये असे दोन लाख 75 हजार रुपये खर्च केला.
 
दोघांचा विवाह 15 एप्रिल रोजी आश्रमशाळा तांबेवाडी, ता. बार्शी येथे करण्याचे ठरले आणि मुलीच्या वडिलांने लग्न पत्रिका छापून नातेवाइकांना कळविले. तसेच नामदेव जाधव यांना तयारीबाबत विचारणा केली तेव्हा नामदेव यांनी माझा मुलगा आकाश उस्मानाबाद येथे रूमवर राहत होता. तो तेथे नाही आणि कुठे गेला आहे, हे माहीत नाही, असे मुलीच्या वडिलांना सांगितले.
 
तेव्हा मुलीच्या वडिलांनी लग्नाबद्दल आपली काळजी मांडली तर तुमच्या मुलीचे काय करायचे ते करा हे लग्न होणार नाही, असे मुलाच्या वडिलांनी सांगितले. लग्न मोडून मुलीची व तिच्या कुटुंबाची बदनामी करून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.