मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी नाशिक मनसेकडून अमित शाहा यांना पत्र
ठाण्याच्या उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाटी राज्य सरकारला 3 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आता मनसेनं मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच पत्र लिहिलं आहे. नाशिक मनसेने अमित शाहा यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मशिंदीवरी मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होण्याबाबत आता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊन राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी नाशिक मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्राद्वारे केली आहे.
“भोंग्यांमधून अजानच्या घोषणा देणे हा इस्लामचा भाग नसून अनेक मुस्लिम देशांमध्ये यावर कडक निर्बंध आहेत. मशिदींवरील भोंग्यामधून उच्चस्वरात करण्यात येत असलेल्या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेत भंग होत आहे. याशिवाय यामुळं भारतीय राज्यघटनेचे कलम २१ अन्वये दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनी प्रदूषणामुळे व्यत्यय येत आहे. हे लक्षात घेत मशिदींवरील भोंगे उतरवावेत असा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालय ही देशातील सर्वोच्च न्यायसंस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे संपूर्ण देशात तंतोतंत पालन होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे २०२२ पर्यत मुदत दिली आहे. राज्यातील सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी राज ठाकरे यांनी दिलेल्या या मुदतीस अकारण धार्मिक रंग देत विविध पक्षातील नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात येत आहेत”, असं या पत्रात म्हटले आहे.