Dharma Sangrah
✕

LIVE: पुणे स्थानकात प्रवेश करताना सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला

Published: सोमवार, 27 एप्रिल 2026 (22:49 IST)

या पावसाळ्यात मुंबईत समुद्राचा प्रकोप पाहायला मिळेल, २४ वेळा मोठी भरती येण्याची शक्यता आहे. १६ जुलै रोजी ४.८९ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. बीएमसीने याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सविस्तर वाचा 

राज्य सरकारची लाडक्या बहिणींसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी उरला असून ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या दिवसांनंतर लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना अपात्र घोषित केले जाणार. सविस्तर वाचा 

मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर रस्त्याजवळील 'सोमानी ग्राम' परिसरात, एका कथित धोकादायक स्टंटचे चित्रण असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.सविस्तर वाचा 

आम आदमी पार्टी सध्या एका गंभीर संकटाचा सामना करत आहे. राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल यांच्यासह पक्षाच्या सात राज्यसभा खासदारांनी पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सविस्तर वाचा 

नाशिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात यांच्या जीवाला तुरुंगात आणि प्रवासात धोका असल्याचा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला, त्यानंतर न्यायालयाने त्याला पुन्हा एसआयटीच्या ताब्यात दिले.

भारतीय जनता पक्षाने नाशिक शहरातील गजबजलेल्या उंटवाडी परिसरातील सेंट्रल पार्क या उच्चभ्रू निवासी प्रकल्पात मुस्लिम वसतिगृह सुरू करण्याचा कथित प्रयत्न हाणून पाडला आहे. 

अवैध खाणकाम आणि स्टोन क्रशरवरील कारवाई तीव्र करत, महाराष्ट्र सरकारने आता ५०० ते २५,००० खडीच्या उत्खननासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य केली आहे.

अवैध खाणकाम आणि स्टोन क्रशरवरील कारवाई तीव्र करत, महाराष्ट्र सरकारने आता ५०० ते २५,००० खडीच्या उत्खननासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य केली आहे. सविस्तर वाचा

मुंबईत एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा संशयित अन्न विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. माहिती समोर आली आहे की, कलिंगड खाल्ल्यानंतर ते सर्व आजारी पडले.  सविस्तर वाचा

नाशिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात यांच्या जीवाला तुरुंगात आणि प्रवासात धोका असल्याचा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला, त्यानंतर न्यायालयाने त्याला पुन्हा एसआयटीच्या ताब्यात दिले. सविस्तर वाचा 
 

बागेश्वर धामचे प्रमुख, आध्यात्मिक गुरू धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, वाद आणि माध्यमांचे लक्ष हे त्यांचे नशीब बनले आहे. सविस्तर वाचा 

राज्यात सध्या उष्णता तीव्र वाढली असून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहे. अनेक  जिल्ह्यात तापमानात वाढ झाली असून ४० अंशाच्या वर तापमान आहे. काही भागात तापमान ४५ अंशाचा वर गेला असून नागरिक गरमीने हैराण झाले आहे.  सविस्तर वाचा 

पुण्यातील पुरंदर येथील एका मशरूम कंपनीतील गटार टाकीत गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला.  सविस्तर वाचा 
 

महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. भाषा शिकण्यासाठी संघटनेने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. सविस्तर वाचा

एप्रिल २०२६ मध्ये, देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचंड उष्णतेने विक्रम मोडले आहे. महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावतीसारख्या शहरांमधील तापमान राजस्थानपेक्षा जास्त, म्हणजेच ४६ अंशांवर पोहोचले आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडू शकते. सविस्तर वाचा 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, पालिकेचे अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्यांनी लोकांना पुरेसे पाणी पिण्याचा व अनावश्यक उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. सविस्तर वाचा

पुणे स्थानकात प्रवेश करताना सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा डायमंड क्रॉसिंगजवळ रुळावरून घसरला. सुदैवाने, सर्व प्रवासी सुरक्षित आहे. सविस्तर वाचा

अकोला जिल्ह्यातील केलिवेली चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने १४ वर्षीय तेजस मांडले याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी तीन तास रस्ता रोको आंदोलन केले. सविस्तर वाचा 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग

मुंबईतील अँटॉप हिल येथील म्हाडा फ्लॅट् बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा आरोप, किरीट सोमैया यांची चौकशीची मागणी

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; गस्त घालणाऱ्या सीआरपीएफ जवानांवर गोळीबार

धरणात अंघोळ करताना वडील आणि दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग लागली, दीड तासात आगीवर नियंत्रण

पुढील लेख
Show comments