शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (13:11 IST)

लग्न जमत नसल्याने स्वत:चं सरण रचून शेतकरी तरुणाची आत्महत्या

Buldhana youth commits suicide for depression of not getting married
शेतकरी असल्यामुळे लग्न ठरतं नव्हतं कारण कोणीही मुलगी देण्यास तयार नव्हतं. अशात आपलं लग्न जुळत नसल्याने बुलढाण्यातील तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.  खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील 29 वर्षीय महेंद्र नामदेव बेलसरे या अविवाहित तरुणाने स्वतःचे सरण रचून त्यामध्ये उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
 
महेंद्र नामदेव बेलसरे  या शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली आहे. या संदर्भात मृतकाच्या भावोजींनी पोलिसांना सांगितले की महेंद्र हा माझा मेव्हणा असून शेती व्यवसाय करत होता. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता महेंद्र त्यांना भेटण्यासाठी गेला होता. ते पेट्रोल पंपावर काम करतात. तेव्हा महेंद्रने आपल्याला कुणी मुलगी देत नाहीये तसेच माझं लग्न करुन द्या असे त्यांना सांगितले. तेव्हा भावोजींनी मी तुझ्यासाठी मुलगी पाहतो असं म्हटलं आणि नंतर महेंद्र निघून गेला.
 
नंतर सायंकाळी 5 वाजता त्याने पुन्हा भावोजींची भेट घेतली आणि नंतर त्यांची पत्नी पुष्पा हिला भेटण्यासाठी घरी गेला आणि मग आपल्या घरी निघून गेला. नंतर रात्री 8 वाजता त्याच्या गावातून किशोर बेलसरे याने फोन करुन सांगितले की महेंद्र याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. घटनास्थळी पोहचल्यावर महेंद्र बैलाच्या गोठ्यात मृतावस्थेत आढळून आला.