शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (11:43 IST)

सहा वर्षाच्या मुलासह बापाने घेतली धावत्या ट्रेन समोर उडी

मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेससमोर एका व्यक्तीने आपल्या मुलासह उडी मारली. ही हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर सहा वर्षाचा मुलगा या अपघातातून सुखरूप बचावला आहे. 
 
ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. रेल्वे पोलिसांनी या मुलाला आईच्या ताब्यात दिलं असून वडिलांचा मृतदेह पुढील कारवाईसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला आहे. 
 
उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात राहणारे प्रमोद आंधळे आपल्या सहा वर्षाचा मुलगा स्वराजसह विठ्ठलवाडी स्थानकात पोहचले आणि मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस या धावत्या रेल्वेसमोर प्रमोद यांनी मुलासह उडी मारली. प्रमोद यांनी रेल्वेखाली उडी मारताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वराज ट्रॅकमधून बाहेर पडल्याने बचावला.
 
प्रमोद आंधळे उल्हासनगरच्या शांती नगर परिसरात आपली पत्नी मुलगा आणि मुलीसह राहत होते. प्रमोद बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते. प्रमोद यांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.